स्मृती इराणी यांना द कपिल शर्मा शोच्या सेटवर जाण्यापासून रोखण्यात आलं असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. या प्रकरणानंतर कपिल शर्मानं स्मृती इराणी यांची माफी मागितली.
मिळालेल्या माहितीनुसार सेटवरच्या सुरक्षारक्षकाने स्मृती इराणी यांना द कपिल शर्माच्या सेटवर जाऊन दिलं नाही. त्यांनी बराच वेळ बाहेर वाट बघितली.
पण एखाद्या मंत्री कोणत्याही सिक्युरिटीशिवाय कशा येऊ शकतात म्हणून सेटवरच्या सुरक्षारक्षकाने स्मृती इराणी यांना सेटवर येऊ दिलं नाही.
काही वेळ वाट पाहिल्यानंतर स्मृती इराणी यांनी नियोजित फ्लाइट पकडण्यासाठी निघून गेल्या. आपल्या आगामी लाल सलाम या पुस्तकाच्या प्रमोशनसाठी त्या सेटवर येणार होत्या.
या प्रकरणाची माहिती कपिल शर्माला मिळाल्यानंतर सुरक्षारक्षकाला झापलं आणि स्मृती इराणी यांची माफी देखील मागितली.