गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप संपण्याच्या मार्गावर आहे. आज गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी आझाद मैदानावरचं एसटी कर्मचाऱ्यांचंआंदोलन तात्पुरते मागे घेत असल्याची घोषणा केली.
ADVERTISEMENT
एसटी कर्मचाऱ्यांना जर आंदोलन चालू ठेवायचे असेल तर त्यांना देखील आमचा पाठिंबा असेल, असं गोपीचंद पडळकर यांच्याकडून सांगण्यात आलं आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात ७२०० रुपयांपर्यंत वाढ
ADVERTISEMENT
राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. नवीन कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात सरकारने ५ हजारांची वाढ केली असून इतर भत्ता मिळून एकूण ७ हजार २०० रुपयाची वाढ झाली आहे. अद्याप एसटी कर्मचाऱ्यांची विलीनीकरणाची मागणी सरकारकडून पूर्ण करण्यात आलेली नाही.