एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला तरच पगारवाढ लागू होऊ शकते. संप मागे न घेतल्यास या निर्णयाचा फेरविचार करावा लागेल, असा इशाराच परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना दिला आहे.
पगार वाढ करूनही एसटी कर्मचाऱ्यांनी आपला संप सुरूच ठेवला आहे. जोपर्यंत एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण होत नाही पर्यंत संप चालू ठेवणार अशी कर्मचाऱ्यांची भूमिका आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या या भूमिकेवर अनिल परब म्हणाले की एसटी कर्मचाऱ्यांचा पगार वाढवूनही संप सुरू राहणार असेल तर त्याला काही अर्थ नाही नाही. जर सरकार चार पावलं पुढं आलं आहे तर कर्मचाऱ्यांनी देखील संप मागे घेत कामावर यावे.
जर कर्मचारी संपावर ठाम राहिले तर पगारवाढीच्या निर्णयावर फेरविचार करावा यावा लागेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
तसेच परब यांनी सांगितले की आर्थिक भार स्वीकारत राहायचा आणि त्या बदल्यात एसटी बंद ठेवायची हे चालणार नाही. एसटी कर्मचाऱ्यांना पगार वाढवत असताना सरकारने वेतनाची हमी घेतली आहे.
एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा आणि चार वर्षांचा करार दहा वर्षाचा करावा, या मागण्यांवर देखील विचार केला जाऊ शकतो, असं देखील ते म्हणाले.