सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत असून लग्नाच्या मंडपाला आग लागली तरी आलेले पाहुणे जेवणावर ताव मारत असल्याचं व्हिडिओत दिसत आहे. हा व्हिडीओ भिवंडीतील अन्सारी मॅरेज हॉलमधील आहे.
ठाण्यातील अन्सारी मॅरेज हॉल येथे एक लग्न समारंभ आयोजित करण्यात आला होता. दरम्यान स्टोअर रूममध्ये अचानक आग लागली.
आग लागल्याचे दिसत असले तरी लोक जेवणावर ताव मारत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
स्टोअर रूममध्ये लग्न मंडपात लागणारे डेकोरेशन सामान ठेवलं होतं आणि लग्नादरम्यान फटाके वाजवल्याने ही आग लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही. मात्र पार्किंगमध्ये लावलेल्या सहा दुचाकी गाड्या जळून खाक झाल्या आहेत.
#WatchVideo: Even as fire-ravaged #AnsariMarriage ground in #Bhiwandi last night, people seem to have enjoyed their dinner in a marriage reception held in the same compound #Marriage #ViralVideo #News #Trending #WeddingSeason #LoveForfood pic.twitter.com/sn6oHqCuj1
— Free Press Journal (@fpjindia) November 29, 2021