महागाईचा फटका सर्वसामान्यांना बसत असून बुधवारी पेट्रोल कंपन्यांनी व्यावसायिकांना दणका देत गॅस सिलेंडरची किंमत तब्बल शंभर रुपयांनी वाढवली आहे. आजपासून ही दरवाढ लागू करण्यात आली.
ADVERTISEMENT
दिल्लीत 19 किलो वजनाच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरसाठी आजपासून 2104 रुपये मोजावे लागणार आहेत. तर कोलकतामध्ये 2174 रुपये मोजावे लागतील. मुंबईत व्यावसायिक सिलेंडर घेण्यासाठी 2051 रुपये मोजावे लागतील.
घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणतेही बदल करण्यात आले नाहीत.
ADVERTISEMENT