उसाची वाहतूक करत असताना ऊसाची ट्रॉली पलटी झाल्यानं घरात झोपलेल्या आजी आणि आठ वर्षाच्या नातीचा उसाच्या ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाल्याची घटना परभणी जिल्ह्यात घडली.
त्यामुळे अवैध ऊस वाहतुकीचा प्रश्न पुन्हा समोर आला आहे. ही घटना परभणी जिल्ह्यातील पाथरी येथील बाभळगावात घडली. पारूबाई पवार आणि नात शिवानी जाधव घरासमोर चारपाईवर झोपल्या होत्या.
दरम्यान ऊसाने भरलेला ट्रॅक्टर वेगाने आला आणि पलटी झाला. त्यामुळे दोघीही उसाच्या ढिगाऱ्याखाली दबल्या आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. त्या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
सध्या परभणी जिल्ह्यात पाऊस तोडणीला सुरुवात असल्याने उसाची मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू आहे. मात्र क्षमतेपेक्षा जास्त ऊस ट्रॉलीत भरून त्याची वाहतूक केली जाते.
या प्रकारामुळे अनेक अपघातही घडले आहेत. मात्र त्यावर ठोस उपाययोजना करण्यात आली नाही.