दक्षिण आफ्रिका खंडात ’डेल्टा’ संसर्ग जाऊन आता ‘ओमायक्रॉन’चे (Omicron Variant ) भूत चांगलेच मानगुटीवर बसले असून, त्याची संख्या वेग धरत चालली आहे. महाराष्ट्रात देखील या संख्येचा आकडा वाढला आहे.
महाराष्ट्रात ‘ओमायक्रॉन’बाधितांची संख्या १० वर पोहोचली असून, आता लहान मुलांचे लसीकरण आणि बुस्टर डोसकरता केंद्र सरकारकडे आग्रह धरणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
राजेश टोपे यांनी लसीकरणाच्या संदर्भात माहिती देताना असेही म्हटले आहे की, “जिनोम सिक्वेन्सिंग तपासणीची औरंगाबाद आणि नागपूरमध्ये नवीन लॅब तयार करणार आहे.” ओमायक्रॉन बाधितांची संख्या ही महाराष्ट्रात १० पोचली असून, ज्यात मुंबई ,पुणे, पिंपरी चिंचवड डोंबिवली या शहरांचा समावेश आहे.
मुंबई
मुंबईत ओमायक्रॉन बाधित २ रुग्ण सापडले आहेत. जे परदेशातून मुंबईत आले होते. आफ्रिकेतून २५ नोव्हेंबर रोजी मुंबईत आलेल्या ३७ वर्षीय व्यक्तीला ओमायक्रॉन विषाणूची लागण झाली असून, या व्यक्तीसोबत राहिलेल्या आणि अमेरिकेतून आलेल्या ३६ वर्षीय व्यक्तीला देखील देखील ओमायक्रॉन व्हेरियंटची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.
पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड या शहरात ओमायक्रॉन व्हेरियंटने एकाच कुटुंबातील सहा लोक बाधित झाले आहे. ज्यात ४४ वर्षीय महिला ते १८ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या व्यक्तीचा समावेश आहे. सदर ४४ वर्षीय महिला नायजेरियातून भावाला भेटण्यासाठी २ मुलींसह आली होती, ओमायक्रॉन लागण झाली आहे.
पुणे
पुण्यात देखील ४७ वर्षीय व्यक्तीला ओमायक्रॉनची लागण झाली आहे. या व्यक्तीला फिनलँड देशात ताप आला होता. त्यामुळे त्याने कोरोना चाचणी केली. यामध्ये तो पॉझिटिव्ह आढळला असून, त्याने कोविशिल्ड लस घेतली आहे. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे.
डोबिंवली
डोबिंवलीत देखील एकाच कुटुंबातील ४ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. हे कुटुंब नायजेरियातून डोंबिवली आले आहे. ज्यांचे सॅम्पल तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. जे अद्यापही प्रतिक्षेत आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या भाऊ आणि आईचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.
या परिस्थितीचा आढावा लक्षात घेत आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले आहेत की, “ओमायक्रॉन रुग्णांची वाढती पाहून राज्य सरकार अलर्ट झालं असलं तरी सध्या निर्बंध लावणे जनतेसाठी कठीण जाईल.” त्याचबरोबर परिस्थितीचा अंदाज लक्षात घेऊन योग्य तो निर्णय घेण्यात येणार असल्याचे देखील ते म्हणाले आहेत.