रांची | बिहारमधील औरंगाबाद जिल्ह्यातील एका ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत अतिशय घृणास्पद घटना घडली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत महादलीत समाजातील काही तरुणांनी मतदान न केल्यानं त्यांना थुंकी चाटायला लावली असल्याचा प्रकार घडला आहे.
या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संबंधितांवर कारवाई करण्यात आली आहे.
अनिल कुमार भुयान आणि मनजीत भुयान या दोन महादलीत समाजातील तरुणांनी पंचायत निवडणुकीत मुख्याधिकारी पदासाठी मतदान केलं नाही.
यामुळे पंचायतीचे प्रमुख उमेद्वार बलवंत कुमार याने आणि त्याच्या साथीदारांनी या दोन्ही तरुणांना मारहाण केली. तसेच रस्त्यावरील थुंकी या दोघांना चाटायला लावली.
याप्रकरणी मनजीत भुयान यांनी बलवंत कुमार यांच्या विरोधात एफआयआर दाखल केली आहे. तसेच या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर पोलिसांनी बलवंत कुमार यांना बेड्या ठोकल्या आहेत. एसएचओ नरेंद्र कुमार याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.