चंडीगडची मुलगी हरनाज संधू ‛मिस युनिव्हर्स’ २०२१ या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करत आहे. यावर्षीची सर्वात मोठी सौंदर्य स्पर्धा इस्रायलमध्ये आयोजित केली जात आहे.
मिस युनिव्हर्स २०२१ च्या नावाची घोषणा १२ डिसेंबर रोजी इस्रायलमधील इलात या ठिकाणी पार पडली आहे. भारतीय अभिनेत्री उर्वशी रौतेला हिचा देखील मिस युनिव्हर्स २०२१ च्या परिक्षाकाच्या पॅनलमध्ये समावेश आहे.
दरम्यान, या सौंदर्यस्पर्धेत भारताच्या हरनाज संधूने बाजी मारत ‛मिस युनिव्हर्स २०२१’ चा’ किताब मिळवला आहे.
मिस युनिव्हर्स हा किताब भारताकडे २००० साली अभिनेत्री लारा दत्त हिने मिळवला होता. दरम्यान, २१ वर्षांनंतर पुन्हा एकदा हा किताब हरनाज संधू हिने मिळवला आहे.
या स्पर्धेच्या प्राथमिक टप्प्यात ७५ हून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला होता. त्याचबरोबर आता या शर्यतीत मिस स्वीडन, मिस थायलंड, मिस युक्रेन, मिस यूएसए, मिस व्हेनेझुएला, मिस कॅमेरून, मिस ब्राझील, मिस ब्रिटिश व्हर्जिन आयलंडसह अनेक सौंदर्य दिवा सामील झाले होते.
मिस युनिव्हर्स स्पर्धेत भारताला जिंकवण्यासाठी ती सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे तिने सांगितले होते. हरनाझने तिच्या आतापर्यंतच्या यशाचे श्रेय तिच्या आईला दिले आहे.
याअगोदर, हरनाजने २०१७ साली टाईम्स फ्रेश फेस मिस चंदीगड, २०१८ साली मिस मॅक्स इमर्जिंग स्टार, २०१९ साली फेमिना मिस इंडिया पंजाब आणि आता २०२१ साली मिस इंडिया युनिव्हर्स हा किताब मिळवला आहे.
दरम्यान, मिस युनिव्हर्स २०२१ चा भाग होण्याआधीच हरनाजने चित्रपटांमध्ये तिचे स्थान मजबूत केले आहे. पुढच्या वर्षी रिलीज होणाऱ्या ‛बाई जी कुट्टांग’ ‛यारा दियां पू बारां’ या दोन पंजाबी चित्रपटांमध्ये ती दिसणार आहे.