प्रसिद्ध ई-कॉमर्स कंपनी ॲमेझॉनला एका प्रकरणात नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी भारतीय प्रतिस्पर्धा आयोगाने 202 कोटींचा दंड ठोठावला. तसेच ॲमेझॉनने 2019 मध्ये फ्यूचर कुपन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सोबत केलेला करार देखील रद्द केला आहे. cci imposes rs 200 crore penalty on amazon
ॲमेझॉनने फ्युचर समूहात गुंतवणूक करण्यासाठी मंजुरी घेताना माहिती लपवल्याचं आयोगाने म्हटलं आहे.
57 पानांच्या आदेशात नियामक आयोगाने सांगितलं आहे की अमेझॉन आणि फ्युचर समूहाच्या कराराची नव्याने चौकशी करणं गरजेचं आहे. त्यामुळे 2019 मध्ये दिलेली मान्यता रद्द करण्यात येत आहे.