पुणे: गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. नुकतंच आता हिवाळी अधिवेशन पार पाडले.
त्यानंतर माध्यमांशी बोलताना अजित पवारांनी सांगितलं की, अधिवेशन उपस्थित असणारे 10 हून अधिक मंत्री आणि 20 हून अधिक आमदारांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे.
अशातच राष्ट्रवादीचे आमदार आणि शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांची कोविड-19 चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.
रोहित पवार सोमवारी (दि.3) कर्जत नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करर्जतला गेले होते. या पार्श्वभूमीवर त्यांनी काही प्रमुख कार्यकर्त्यांसोबत म्हत्वाची बैठक घेतली. यानंतर ते माजी मंत्री पंकजा मुंडे यांना कार्यक्रमादरम्यान भेटले.
आणि यांच्या भेटीनंतर पंकजा मुंडे कोराना बाधित असल्याचे आढळून आले. त्यावेळी रोहित पवार यांनी तात्काळ कोरोना चाचणी केली. परंतु,त्यामध्ये त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला होता.
मात्र, यावेळी आता रोहित पवार यांना कोरोना संसर्ग झाला आहे. याची माहिती स्वतः रोहित पवार यांनी ट्वीट करत दिली आहे.
रोहित पवार यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिले की, तुमच्या सोबत त्याच्याशी लढत असताना गेली दोन वर्षे त्याला हुलकावणी देत होतो, पण अखेर त्याने मला गाठलंच.
माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली. पण आपला आशीर्वाद असल्याने काळजीचं काही कारण नाही. माझ्या संपर्कात आलेल्यांनी टेस्ट करून घ्यावी आणि काही लक्षणे असल्यास तातडीने उपचार घ्यावेत.
राज्यातील कोरोना रुग्णांची आकडे पुन्हा झपाट्याने वाढत आहेत. याला राज्यातील नेतेमंडळी देखील हातभार लावत आहेत का? असा सवाल उपस्थित होतोय.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी पवार कुटुंबातील सदस्य असलेल्या खासदार सुप्रिया सुळे आणि त्यांचे पती सदानंद सुळे यांचीही कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. सुप्रिया सुळे यांनी स्वत:च त्याबाबत माहिती दिली होती.