राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने पुणे जिल्ह्यातील १ ली ते ८ वीच्या सर्व शासकीय आणि खासगी शाळा आजपासून बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
पुणे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी याबाबत आदेश जारी केला आहे. राज्यात ओमायक्रोन आणि वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
मात्र या शाळा जरी ऑफलाईन बंद झाल्या असल्या तरी ऑनलाईन पध्दतीने वर्ग सुरु ठेवण्याचे आदेश शाळांना देण्यात आले आहेत. ४ जानेवारी रोजी झालेल्या बैठकीत हा आदेश जारी करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
या सोबत राज्यातील कॉलेज आणि महाविद्यालये सुरु राहणार का? याबाबत निर्णय आज सायंकाळी ४ वाजता जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती उच्चशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आपल्या ट्विटरवरुन दिली आहे.