नवी दिल्ली: भारतात झपाट्याने पसरणाऱ्या कोरोना महामारीने दिल्लीतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे (भाजप) मुख्यालय ठोठावले आहे. दिल्लीतील भाजप मुख्यालयातील ४० हून अधिक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे.
सोमवारी भाजप कोअर ग्रुपच्या बैठकीपूर्वी सामूहिक चाचणी घेण्यात आली होती, ज्यामध्ये 42 कर्मचारी कोविड पॉझिटिव्ह आढळले होते. संक्रमित लोकांमध्ये अनेक स्वच्छता कर्मचारी आहेत.
या सर्वांना सेल्फ आयसोलेशनमध्ये राहण्यास सांगण्यात आले आहे. दिल्लीतील मिंटो रोड येथील भाजपचे मुख्यालय नंतर पूर्णपणे स्वच्छ करण्यात आल्याचेही सूत्रांनी सांगितले. भाजपने नवीन प्रोटोकॉल सुरू केला आहे. कोणत्याही मोठ्या बैठकीपूर्वी त्यांच्या दिल्लीतील मुख्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांची कोविड-19 साठी चाचणी केली जाईल.
फक्त कार्यालयाशी संबंधित महत्त्वाच्या कामांमध्ये गुंतलेले लोकच मुख्यालयात येत आहे. काल उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकी संदर्भात भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पक्षाच्या मुख्यालयात पार पडली.
दरम्यान, गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1,94,720 नवे रुग्णांची नोंद झाली आहे. तर 442 जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्णांच्या एकूण संख्येने तब्बल तीन कोटींचा टप्पा पार केला आहे.