रतन टाटांचे नाव कोणाला माहित नसेल असा व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. ते सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे समाज माध्यमांमध्ये चर्चेत असतात. मात्र तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की त्यांना एक लहान भाऊ देखील आहे. Ratan Tata’s younger brother Jimmy Tata
जिमी टाटा असं रतन टाटा यांच्या लहान भावाचं नाव आहे. ते मुंबईतील कुलाबा येथील टू बीएचके फ्लॅटमध्ये राहतात.
त्यांचं राहणीमान अत्यंत साधं आहे. व्यावसायिक हर्ष गोइंका यांनी ट्विटरच्या माध्यमातून याची माहिती दिली
जिमी टाटा फोन देखील वापरत नसल्याची माहिती आहे. त्यांना जगभरात काय चाललंय हे केवळ वर्तमानपत्रांच्या माध्यमातून समजतं.
जिमी यांचे टाटा समूहात शेअर्स आहेत. मात्र या कंपनीत नेमकं काय चाललंय याची माहिती त्यांना केवळ वर्तमानपत्रातून मिळते.
हर्ष गोइंका यांनी केलेल्या ट्विटमधून त्यांनी जिमी टाटा यांच्याविषयी माहिती दिली. ते ट्विटमध्ये म्हणतात की जिमी टाटा यांना व्यवसाय करण्यात आवड नाही. मात्र ते माझ्यापेक्षा चांगलं स्क्वॅश खेळू शकतात.