जगभरात कमी झालेला कोरोना (Corona) आता परत एकदा झपाट्याने वाढताना दिसत आहे. सध्या जगावर कोरोनाचा व्हेरियंट ओमायक्रॉनचे संकट आहे. काही देशांमध्ये या रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत चालली आहे. त्यामुळे वाढत्या रुग्णसंख्येमुळे (patients) कोरोना चाचणीचे प्रमाणही वाढले आहे.
वेस्ट स्कॉटलंड विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी (Scientists) नुकताच एक्स-रे च्या (X-ray) माध्यमातून कोरोना चाचणीचा प्रयोग केला. हा प्रयोग करून त्यावर आनंदाची बातमी म्हणजे त्यावर यश देखील मिळाले आहे. या चाचणीचे ९८ टक्के परिणाम बरोबर असल्याचे
शास्त्रज्ञांनी नोंदवले आहे. ही चाचणी करण्यासाठी शास्त्रज्ञांनी आर्टिफिशियल इंटेजिलन्सचा (Artificial Intelligence) वापर केला आहे.
रिव्हर्स ट्रान्सकिप्शन पॉलीमर्स चेन रिॲक्शन चाचणीपेक्षाही लवकरात लवकर मिळणार एक्स-रे चाचणीचा (Test) अहवाल. असे वेस्ट स्कॉटलंड विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी म्हंटले आहे. अवघ्या ५ ते १० मिनिटांमध्ये (Minutes) रुग्णाला कोरोना लागण झाली का? याची माहिती मिळू शकते. तसेच एक्स-रे चाचणी च्या माध्यमातून ओमायक्रॉन व्हेरियंटची लागण झाली आहे का नाही याचीही माहिती मिळेल, असे शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले आहे.