बारामती येथील ५ मुलांनी आपली जबरदस्त कामगिरी दाखवत बारामती तालुक्याचे नाव उंचावले आहे. गोव्यामधील पणजी येथे स्केटिंग स्पर्धा पार पडली.
पणजीमध्ये झालेल्या या स्केटिंग स्पर्धेत बारामती येथील किप ऑन रोलिंग क्लबमधील पाच खेळाडूंनी आपली जबरदस्त कामगिरी दाखवत यशाचे शिखर गाठले.
या पाच खेळाडूंची नावे अधिराज बर्गे, रिद्दीश कुंभार, दक्षता आतर्डे, निशांत आर्डे आणि सिया गांधी आहे. यापैकी अधिराज बर्गे, रिद्दीश कुंभार, दक्षता आतर्डे या तीन खेळाडूंनी सुवर्णपदक पटकावले आहे.
तर निशांत आर्डे आणि सिया गांधी त्यांनी कांस्यपदकावर आपले नाव कोरले आहे. या पाचही खेळाडूंना राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेकरता बारामती येथील किप ऑन रोलिंग क्लबचे कोच सचिन शहा यांनी योग्य ते मार्गदर्शन केले.
राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेसाठी बारामतीमधून सात खेळाडू पणजीला गेले होते. तर या सात खेळाडूंपैकी पाच जणांनी यशाच्या शिखरावर धाव घेतली.