राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. ज्याची माहिती त्यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून देत संपर्कात आलेल्यांना खबरदारी घेण्याचे आवाहनही केले आहे.
शरद पवार यांनी ट्विट करत लिहिले की, “माझी कोव्हिड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. पण काळजीचे कोणतेही कारण नाही. माझ्या डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे मी उपचार घेत आहे.
गेल्या काही दिवसांपासून माझ्या संपर्कात असलेल्या सर्वांना मी विनंती करतो की, त्यांनी स्वतःची चाचणी घ्यावी आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी.”
अशाप्रकारे शरद पवार यांनी त्यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याची माहिती दिली आहे. त्याचबरोबर त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांनाच करुणा विषाणूची चाचणी करून योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन देखील केले आहे.
माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी उपचार घेत आहे. काळजीचे कोणतेही कारण नाही.
— Sharad Pawar (@PawarSpeaks) January 24, 2022
गेल्या काही दिवसांपासून माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना विनंती की त्यांनी योग्य चाचण्या करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी.
शरद पवार यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे कळताच मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ही माहिती दिली आहे. त्याचबरोबर त्यांनी शरद पवार यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी सदिच्छा देखील दिल्या आहेत.
जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत लिहिले की, आदरणीय पवार साहेबांची कोव्हिड टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. त्यांच्या प्रकृतीला लवकरात लवकर आराम पडो,या सदिच्छा..! आदरणीय शरद पवार साहेब, आराम करा आणि काळजी घ्या.”