टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली एका कृत्यामुळे सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल होत आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यापूर्वी विराटने राष्ट्रगीतादरम्यान केलेल्या कृत्यामुळे सर्वजण त्याच्यावर भडकले आहेत.
खरंतर, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसर्या एकदिवसीय सामन्यादरम्यान विराट कोहली एक लज्जास्पद कृत्य करताना कॅमेऱ्यात कैद झाला होता. सामन्यापूर्वी राष्ट्रगीत सुरू असताना विराट कोहली चिंगम चघळताना दिसला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
राष्ट्रगीतादरम्यान केली ‘ही’ कृतीराष्ट्रगीताचा अपमान केल्याबद्दल चाहत्यांनी त्याला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केले. या मालिकेसह विराट कोहलीने खेळाच्या सर्व फॉरमॅटमधील कर्णधारपद सोडले आहे. अशा परिस्थितीत कर्णधारपदाच्या जबाबदारीतून मुक्त झाल्यानंतर विराटचा हा प्रकार चाहत्यांना आवडला नाही. विराट कोहलीच्या चुकीमुळे चाहते आणि ट्रोलर्स नाराज झाले. यानंतर लोकांनी बीसीसीआयकडे विराटवर कारवाई करण्याची मागणीही केली.
टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेकडून तिसऱ्या वनडेतही पराभवाचा सामना करावा लागला आहे. तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाचा ३-० असा पराभव केला. दक्षिण आफ्रिकेकडून कसोटी मालिका १-२ ने गमावल्यानंतर विराट कोहलीने खेळाच्या सर्वात मोठ्या फॉरमॅटमध्ये कर्णधारपदही सोडले होते.
टी २० विश्वचषक २०२१ नंतर, विराट कोहलीने टी २० क्रिकेटमधून कर्णधारपद सोडले. परंतु त्यानंतर निवडकर्त्यांनी त्याला एकदिवसीय क्रिकेटमधील कर्णधारपदावरून काढून टाकले. एकदिवसीय कर्णधारपदावरून हटवण्यात आल्याने विराट चांगलाच नाराज झाला होता. प्रत्युत्तरादाखल विराटने सर्व फॉरमॅटमधून कर्णधारपद सोडून फक्त फलंदाज म्हणून खेळण्याचा निर्णय घेतला.