दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना भडकावल्याप्रकरणी तुरुंगात असलेल्या विकास पाठक उर्फ हिंदुस्थानी भाऊची अखेर सुटका झाली आहे.
हिंदुस्तानी भाऊची 30 हजारांच्या जामीनावर सुटका करण्याचे निर्देश दिले आहे. विद्यार्थ्यांनी धारावीत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या निवासस्थानाजवळ आंदोलन केले, अशा आरोपाखाली हिंदुस्थानी भाऊविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदवून त्याला अटक केली होती.
गेल्या काही दिवसांत वांद्रे न्यायालयाने विकासला जामीन देण्यास नकार दिला आहे. १० लाखावर फॉलोअर्स असलेल्या या हिंदुस्थानी भाऊला पालकांनी टपा टप, टपा, एकानंतर एकाने झापले होते.
दरम्यान, गेल्या काही वर्षांपूर्वी सरकारला विरोध करण्यासाठी विद्यार्थ्यांनी रस्त्यावर गोंधळ घातला. सोशल मीडियावर आपला प्रभाव टाकणाऱ्या हिंदुस्थानी भाऊने विद्यार्थ्यांना भडकावले, असा आरोप त्यावर करण्यात आला होता.
सरकारी कर्मचार्यांना कामात अडथळा आणणे, सरकारी कर्मचार्यावर हल्ला करणे, बेकायदेशीर गर्दी जमवणे, दंगल घडवणे, कोरोनाचे नियम उल्लंघन, सरकारी आणि खासगी मालमता नष्ट करणे असे अनेक कलम विकास पाठकच्या विरोधात दाखल करण्यात आले होते.