काही महिन्यांपुर्वी देशभरात पेट्रोल-डिझेलतच्या किंमतींने शंभरी गाठली होती, दिवसेंदिवस या किंमतींत वाढ होत होती, मात्र देशात ५ राज्यांच्या निवडणुकांमुळे किंमती स्थिर राहून सर्वसामान्यांना दिलासा मिळाला.
रशिया-युक्रेन युध्दाच्या पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाच्या किंमती गगणाला भिडल्या आहे, आंतराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती १०० डॉलरवर जाऊन पोहचल्या आहेत. याचा परिणाम संपुर्ण जगभरातील पेट्रोल-डिझेलच्या किंमतींवर होणार आहे.
यासोबत रशिया-युक्रेन युध्द असंच सुरु राहिले तर हे भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे, २०१४ नंतर पहिल्यांदाच कच्च्या तेलाचे भाव १०० डॉलरवर पोहचले आहेत.
दरम्यान, २०२२ मध्ये कच्च्या तेलाचे भाव प्रती बॅरल १२५ डॉलर तर २०२३ पर्यच हेच भाव प्रती बॅरल १५० डॉलरवर जाण्याची शक्यता अनेक तज्ञांनी व्यक्त केली आहे, यामुळे सर्वसामान्यांच्या चिंतेत भर पडली आहे.