बीड: कांदा चिरताना आईच्या डोळ्यातून पाणी येत असल्यामुळे बीडमधील एका शाळकरी मुलाने अनोखी शक्कल लढवून स्मार्ट चाकू बनविला आहे. हा स्मार्ट चाकू बनविणारा विद्यार्थी सातवीच्या वर्गात शिकत आहे.
संबंधित विद्यार्थ्याचे नाव ओंकार शिंदे असून तो बीड जिल्ह्यातील कुर्ला गावातील निवासी आहे. ओंकार हा कुर्ला गावच्या जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत सातवी वर्गामध्ये शिकत आहे. तसेच, हा अनोखा चाकू बनवल्यामुळे त्याची सर्वत्र चर्चा होत आहे.
दरम्यान, ओंकारला कांदा चिरताना आईच्या डोळ्यातील अश्रू पाहिले नाही आणि त्याला कल्पना सुचली. यानंतर आपल्या कल्पक बुद्धीने ओंकारने एका अनोख्या चाकूची निर्मिती केली.
या चाकूचा शोध लावण्यास त्याला केवळ ७ दिवसांचा कालावधी लागला आहे. या स्मार्ट चा कोणता प्रयोग करण्याची प्रेरणा त्याला त्याच्या शिक्षकाकडून मिळालेली आहे.
तसेच, या चाकुला ओंकारने ‘स्मार्ट चाकू’ असे नाव दिले आहे. ओंकारच्या कष्टकरी आई-वडिलांना त्याच्या या गौरवामुळे आनंद झाला आहे.