बऱ्याच वेळा असं होतं की शेतात एखादं पीक (Crop) लावलं किंवा आपल्या घरासमोर बागेमध्ये फुलझाड लावलं त्याची चांगली काळजी (Care) घेतली, वेळेवर खतपाणी टाकले तरीही ते झाड काही सुधारतं नाही. त्याउलट जंगलातील झाडांना कोणत्याच प्रकारचं खत नसते आणि पाणी (Water) देखील वेळेवर उपलब्ध नसतं तरी ती झाडे हिरवीगार असतात. ती अशी का असतात याबाबद्दल माहिती (Information) जाणुन घेऊया.
यावर जवाहरलाल नेहरू कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांना जिवाणूपासून शेती (agriculture) सुधारण्याचा मार्ग दाखवला आहे. यामध्ये खत न घालता देखील हे जिवाणू पिकांच्या मुळांमध्ये टाकून चांगले पीक घेता येते. यावर डॉ. स्वप्नील सप्रे सांगतात की आम्ही तीन ठिकाणी जाऊन, तीन वेगळी वेगळी रोपे घेऊन त्याच्या जिवाणू (Bacteria) काढले आणि त्यांची ओळख पटवली. त्या वनस्पतींचे विकासात्मक गुण ओळखुन हे जिवाणू प्रयोग शाळेत (experiment school) विकसित केले गेले.
या पिकांची चाचणी यशस्वी झाली
या जिवाणूंची हरभरा, मूग, उडीद, रिसबीन, वाटाणा आणि गहू अशा अनेक पिकांमध्ये चाचणी करण्यात आली. हे जिवाणू दुष्काळात पिकांना दिल्यास उत्पादन (Production) वाढू शकते. हे जिवाणू सेंद्रिय शेती आणि कोणत्याही प्रकारचे बदलते हवामान या दोन्हीमध्ये उपयुक्त ठरू शकते.
आतापर्यंत ३० जिवाणूंची ओळख
वेगवेगळ्या तीन (Three) वनस्पतींची मुळे बाजूला काढून आत्तापर्यंत ३० जिवाणू शोधले आहेत. पण आत्तापर्यंत आम्हाला असे कोणतेच जिवाणू सापडले नाहीत जे पिकाच्या वाढीस किंवा उत्पादनास प्रतिबंध करतात. या जिवाणू च्या मदतीने नैसर्गिक (Natural) शेती करणे सोपे होणार आहे. लवकरच JNKV चे व्यवसायिकरण करणार आहोत. यामुळे आपण कोणतेही खत (Fertilizer) न घालता, दुष्काळी परिस्थिती मध्ये देखील चांगले पीक घेऊ शकतो.