• Home
  • ताज्या बातम्या
  • लेख
  • संपर्क
  • आमच्यासाठी लिहा
  • Advertisement
Thursday, June 30, 2022
The Bhongaa
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • खेळ
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • रोजगार
  • मनोरंजन
  • लेख
  • The Bhongaa Stories
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • खेळ
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • रोजगार
  • मनोरंजन
  • लेख
  • The Bhongaa Stories
No Result
View All Result
The Bhongaa
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • खेळ
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • रोजगार
  • मनोरंजन
  • लेख
  • The Bhongaa Stories
ADVERTISEMENT
Home ताज्या बातम्या

Movie Review: नागराजने विपीनसारख्या पोरांवर विश्वास ठेवून ‘झुंड’ हे दिलेलं उत्तर आहे

by The Bhongaa
March 6, 2022 - Updated on March 7, 2022
in ताज्या बातम्या, लेख, सामाजिक
Reading Time: 1 min read
A A

‘झुंड’ समीक्षा करून उलगडून दाखवावा इतका तो अवघड विषय नाही. तो सभोवतालाच्या बहुसंख्यांकांच्या जीवनाचा विषय आहे. थिएटरमध्ये वाहणाऱ्या शिट्ट्या, पात्रांना रिलेट करणारी कुजबुज आणि प्रेक्षकांचा नाच हाच त्याचा खरा प्रतिसाद आहे. झुंड हा तुमच्या-आमच्या मनातला ‘सवाल’ आहे, त्यामुळे तो भावतो.

आंबेडकरी चळवळ फार प्रयोगशील आहे. नवनवीन आव्हाने स्वीकारते. सृजनशीलतेकडे सतत आगेकूच करत असते, त्याचमुळे ‘दलित साहित्य’ हा आंबेडकरी चळवळीचा सुंदर आविष्कार ठरला होता. आज ही तो त्यामार्गे परिपक्वता घेऊन पुढे जात आहे.

तसेच ‘दलित थिएटर’ वैगरे या सगळ्यांना सोबत चालवणारे प्रा. अविनाश डोळस यांच्या सारखे नावे ही पुढे येतात. हा इतिहास आज नागराज मंजुळे रुपात कालसापेक्ष धोरण घेऊन पुढे येत आहे आणि ते प्रस्थापितांच्या डोळ्यात खुपत आहे हेच त्यांच्या कलाकृतीसाठी स्वागतार्ह आहे अस मी मानतो.

नागराज मंजुळे खरंतर जात वास्तव भोगलेला एक संवेदनशील माणूस आहे. पुरोगामी सवर्णांच्या कल्पनेपलीकडे पोहचण्याच हे कारण नागराजला मोठं करतं. आपण प्रेमचंद आणि ओमप्रकाश वाल्मिकी या प्रकारात तुलनात्मक दृष्टीने जसं आधी बघायचो तसं अछुत कन्या, मुक्ता यांची तुलना फँड्री, झुंड, काला आदींसोबत होत आहे, ही जमेची बाजू मी मानतो.

संबंधितबातम्या

…म्हणून औरंगाबादचे नाव झाले संभाजीनगर !

शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाची घोषणा होताच बंडखोर आमदारांचा टेबलावर चढून डान्स, पहा व्हिडीओ

एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री, आज ७.३० वाजता घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ

शिंदेंच्या बंडखोरीवर एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट; गुलाबराव पाटलांवरही खोचक टीका

नुकतंच मित्राच्या बहिणीच्या क्षुल्लक आधार कार्डसाठी कागदपत्रांच्या अभावे जमावाजमित कसरत आठवली. बाप किती हतबल असू शकतो, हे जाणवलं. आमच्या वस्तीतल्या प्रत्येक बाबी नागराज मंजुळे टिपतो हे भावलं, पावसात उड्या मारत मारत प्लास्टिकच्या डब्ब्याचा फुटबॉल आम्ही ही खेळलोय. अवमान, अपेष्टा आमच्या ही पदरी पडली आहे.

व्यसनाधिनता आजच आमचा प्रश्न असतांना त्यांचे बदलते रुपडे आमच्या वस्तीच वास्तव आहे. गावकुसाबाहेर असणे हे आजच्या झोपडपट्टीचं नवं असलेलं रूप आहे, हे आम्ही फार आधीच ओळखलं आहे. अशी कैक कारण ‘झुंड माझी कथा आहे’, असं म्हणायला भाग पाडते.

माझ्या वस्तीत प्रत्येकाची एक स्टोरी आहे, असं मला वाटायचं, पण हे वाटणं जेव्हा व्हिज्युअल फॉर्म मध्ये नागराज मंजुळेने दाखवलं तेव्हा कंठ दाटला. तसंच विमानाचा उडण्यासाठीचा संघर्ष हा सांकेतिक असला तर प्रत्येकापर्यंत पोहचणारा होता.

माझा मित्र प्रशांत म्हणतो, “कॅमेरा हातात आल्यावर सुरुवातीला फार भिती वाटायची. हे जात वास्तवातुन आलेलं न्यूनगंड होतं.” आज हाच कॅमेरा नागराजने इतका बखुबी वापरला आहे की, ‘प्रशांत सारखा तो सर्वांना प्रेरणादायी ठरेल.’

मुख्य म्हणजे या न्यूनगंडात वाढ करण्यासाठी धडपडणाऱ्यांनी आमच्या पोरांना ‘छोटे -मोठे नागराज’ म्हटलं, पण नागराज मंजूळेनेच विपीनसारख्या पोरांवर विश्वास ठेवून झुंड हे दिलेलं उत्तर आहे अस मला तरी वाटतं.

अखेर, नागराज मंजुळे कवी मनाचा माणूस आहे. त्याच्या भाषेत सांगायच तर त्याने नामदेव ढसाळ म्हणतो तस, ‘शहराशहरांना आग लावली!’

Tags: jhundMovie Reviewnagraj manjuleझुंडनागराज मंजुळे
ShareTweetSendShare
Previous Post

मितालीने घेतला विराटचा बदला! पाकिस्तानला पराभवाची चव चाखवली

Next Post

नागपूरमध्ये आरोग्य सेविकांसाठी NHM नोकरीची संधी 89 पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू

Related Posts

ताज्या बातम्या

…म्हणून औरंगाबादचे नाव झाले संभाजीनगर !

June 30, 2022
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाची घोषणा होताच बंडखोर आमदारांचा टेबलावर चढून डान्स, पहा व्हिडीओ
ताज्या बातम्या

शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाची घोषणा होताच बंडखोर आमदारांचा टेबलावर चढून डान्स, पहा व्हिडीओ

June 30, 2022
आज संध्याकाळी एकनाथ शिंदे मंत्रीपदाचा राजीनामा देतील? भाजपसोबत पार पडणार बैठक
ताज्या बातम्या

एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री, आज ७.३० वाजता घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ

June 30, 2022
शिंदेंच्या बंडखोरीवर एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट; गुलाबराव पाटलांवरही खोचक टीका
ताज्या बातम्या

शिंदेंच्या बंडखोरीवर एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट; गुलाबराव पाटलांवरही खोचक टीका

June 30, 2022

महत्वाच्या लिंक्स

  • Home
  • ताज्या बातम्या
  • लेख
  • संपर्क
  • आमच्यासाठी लिहा
  • Advertisement

Category

  • Fact Check
  • आंतरराष्ट्रीय
  • खेळ
  • ताज्या बातम्या
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • रंजक किस्से
  • राजकीय
  • रोजगार
  • लेख
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • शिक्षण
  • संपादकीय
  • सामाजिक

आम्हाला फॉलो करा

  • Facebook
  • Instagram
  • Youtube
  • Twitter

© 2021 The Bhongaa - Designed by Bhongaa Media. Hosted on Cloudways.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • खेळ
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • रोजगार
  • मनोरंजन
  • लेख
  • The Bhongaa Stories