पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर आला आहे. पंजाब सोडल तर उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरमध्ये भाजपने बाजी मारली आहे. एकीकडे भाजप जल्लोष साजरा करत आहे. तर दुसरीकडे भाजपवर टीका टिप्पण्या सुरू आहेत.
दरम्यान,विजयाचा उत्सव साजरा करतानी राज्यात शिवसेनेचे दोन ही खासदार निवडून येणार नाही, अशी टीका भाजप नेते यांनी शिवसेनेवर केली आहे.
विजयाचा आनंद असावा पण गर्व नसावा, अशी खोचक टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजप वर केली आहे. नाना पटोले म्हणाले, भारतात लोकशाही आहे.इंदिरा गांधी, अटल बिहारी हे देखील निवडणुका हरले होते.
पुढे नाना पटोले म्हणाले, भाजप मध्ये काय कोणी भ्रष्टाचार करत नाही का. याआधी नारायण राणे यांच्यावर देवेंद्र फडणवीस यांनी आरोप केले होते. आता राणेंचे काय झाले.
राज्य सरकारवर कर्ज होत चाल आहे. केंद्र सरकार महाराष्ट्राला निधी देत नाही. पण आम्ही याचा बोजा लोकांवर पडून देणार नाही अस देखील नाना पटोले म्हणाले.
भाजपचं केंद्र सरकार सुडाचे राजकारण करत आहे. त्यांनी सुडाचे राजकारण थांबवले नाही तर. भाजपला पूर्वीसारखा २ खासदारांचा पक्ष होईला वेळ लागणार नाही, असा नाना पटोले यांनी भाजपला इशारा दिला आहे.