• Home
  • ताज्या बातम्या
  • लेख
  • संपर्क
  • आमच्यासाठी लिहा
  • Advertisement
Tuesday, May 30, 2023
The Bhongaa
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • खेळ
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • रोजगार
  • मनोरंजन
  • लेख
  • The Bhongaa Stories
No Result
View All Result
The Bhongaa
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • खेळ
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • रोजगार
  • मनोरंजन
  • लेख
  • The Bhongaa Stories
ADVERTISEMENT
Home लेख

अजित पवारांनी सांगितलेला अर्थसंकल्प जाणून घ्या सोप्या भाषेत! वाचा

by The Bhongaa
March 11, 2022
in लेख
Reading Time: 1 min read
A A

रितेश मंगला रमेश देशमुख | उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्र सरकारचा २०२२-२३ चा वार्षिक अर्थसंकल्प सादर केला. यात अंदाजे महसुली उत्पन्न रु.४,०३,४२७ कोटी महसुली खर्चाच्या तुलनेत रु. ४,२७,७८० कोटी म्हणजे हा अर्थसंकल्प सुद्धा तुटीचा अर्थसंकल्प आहे. ज्यात २४,३५३ कोटी रुपयांची महसुली तूट असून राज्याच्या अर्थव्यवस्थेत १२.१ टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे.

विकासाची पंचसूत्री म्हणजे कृषी, आरोग्य, मानव संसाधन, वाहतूक आणि उद्योग. पुढील तीन वर्षांत या कार्यक्रमासाठी सरकारकडून ४ लाख कोटी रुपये दिले जातील, ज्यामुळे राज्यातली गुंतवणूक वाढेल आणि एक ट्रिलीयन डॉलर्सची अर्थव्यवस्था असलेलं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरेल.  

शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदराने पीक कर्ज देण्यासाठी व्याज सवलत योजनेंतर्गत ४३ लाख १२ हजार शेतकऱ्यांना ९११ कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात येत आहेत. मनरेगा अंतर्गत ४३,९०२ सिंचन विहिरींची कामे हाती घेतली आहेत. फळबाग लागवडीसाठीच्या सुधारित धोरणानुसार काही पिकांचा नव्याने समावेश केला. रोजगार हमी योजनेसाठी १७५४ कोटी, फलोत्पनासाठी ५४० कोटी देण्यात येतील.  

महिला शेतकऱ्यांसाठी कृषी योजनांमध्ये राखीव असलेली ३० टक्केची तरतूद आता वाढवून ५० टक्के केलेली आहे. तसंच हे वर्ष महिला शेतकरी आणि मजूर वर्ष म्हणून साजरं केलं जाईल. ज्या २० लाख शेतकऱ्यांनी वेळेवर कर्ज भरले त्यांना ५०,००० रुपयांचे प्रोत्साहन मिळेल. यासाठी महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात १०,००० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.‍  

संबंधितबातम्या

…म्हणून प्रयत्न करूनही पवारांना राष्ट्रवादी काँग्रेस साठी ‘चरखा’ चिन्ह मिळाले नाही!

“माझं तुझ्यावर प्रेम आहे” शरद पवार काॅलेजमध्ये ‘प्रेमपत्र’ लिहितात तेव्हा! वाचा

पोलीस भरतीत LGBTQ+ समूहाला संधी मिळाली आहे ती फक्त साताऱ्याच्या आर्या पुजारीमुळेच!

लेख : आठवणींतील सिंधूताई सपकाळ

एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी ४ हजार १०७ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. महामंडळाला ३ हजार नव्या पर्यावरणपूरक बसगाड्या उपलब्ध करून दिल्या जातील. बसस्थानकांचा दर्जा सुधारण्यासाठी, त्यांच्या पुनर्बांधणीसाठी अर्थसाहाय्य उपलब्ध करून दिलं जाईल. परिवहन विभागासाठी ३,००३ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.  

पोलिस कर्मचाऱ्यांसाठी विशेष रुग्णालये उभारण्यात येणार आहेत, बार्टी पुणेला मागासवर्गीय लोकांसाठी योजना राबविण्यासाठी २५० कोटी रुपये मिळणार आहेत तर सारथी पुणे साठी २५० कोटीची तरतूद करण्यात आलीय.  

पर्यावरण पूरक नैसर्गिक वायूचा घरगुती वापर होतो, CNG वर चालणाऱ्या वाहनांना फायदा होतो. यामुळे यावरचा मूल्यवर्धित कर VAT चा दर हा १३.५ टक्क्यांवरून टक्के वरून ३ टक्के करायचा प्रस्ताव आहे. कोरोनामुळे विधवा झालेल्या महिलांसाठी पंडिता रमाबाई महिला उद्योजक योजनेची घोषणा आणि महिलांना स्वयंरोजगरासाठी भांडवल उपलब्ध करून देणार असल्याचे अजित पवारांनी जाहीर केले आहे.  

(सदर लेख हा लेखका्ंच्या फेसबुक प्रोफाईलवर पुर्वप्रकाशित करण्यात आला आहे.)

ShareTweetSendShare
Previous Post

‘विजयाचा आनंद असावा पण गर्व नसावा’ – नाना पटोले

Next Post

बंगळुरूमध्ये शतकाचा दुष्काळ संपणार का? पिंक बॉल कसोटीत विराट कोहली

Related Posts

…म्हणून प्रयत्न करूनही पवारांना राष्ट्रवादी काँग्रेस साठी ‘चरखा’ चिन्ह मिळाले नाही!
लेख

…म्हणून प्रयत्न करूनही पवारांना राष्ट्रवादी काँग्रेस साठी ‘चरखा’ चिन्ह मिळाले नाही!

December 12, 2022
“माझं तुझ्यावर प्रेम आहे” शरद पवार काॅलेजमध्ये ‘प्रेमपत्र’ लिहितात तेव्हा! वाचा
लेख

“माझं तुझ्यावर प्रेम आहे” शरद पवार काॅलेजमध्ये ‘प्रेमपत्र’ लिहितात तेव्हा! वाचा

December 12, 2022
पोलीस भरतीत LGBTQ+ समूहाला संधी मिळाली आहे ती फक्त साताऱ्याच्या आर्या पुजारीमुळेच!
लेख

पोलीस भरतीत LGBTQ+ समूहाला संधी मिळाली आहे ती फक्त साताऱ्याच्या आर्या पुजारीमुळेच!

December 11, 2022
लेख : आठवणींतील सिंधूताई सपकाळ
लेख

लेख : आठवणींतील सिंधूताई सपकाळ

December 10, 2022

महत्वाच्या लिंक्स

  • Home
  • ताज्या बातम्या
  • लेख
  • संपर्क
  • आमच्यासाठी लिहा
  • Advertisement

Category

  • Fact Check
  • आंतरराष्ट्रीय
  • खेळ
  • ताज्या बातम्या
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • रंजक किस्से
  • राजकीय
  • रोजगार
  • लेख
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • शिक्षण
  • संपादकीय
  • सामाजिक

आम्हाला फॉलो करा

  • Facebook
  • Instagram
  • Youtube
  • Twitter

© 2021 The Bhongaa - Designed by Bhongaa Media. Hosted on Cloudways.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • खेळ
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • रोजगार
  • मनोरंजन
  • लेख
  • The Bhongaa Stories