दोन्ही हात नसूनही नशिबाला दोष देत त्या बसल्या नाहीत. तर कष्ट, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर काम सुरू केले. तसेच स्वतःच्या हिंमतीने भारती जाधव यांनी स्वतःचे उदर निर्वाह करण्यास सुरुवात केली. चला तर मग जाणून घेऊया एका अपंग महिलेचा संघर्षमय जीवनप्रवास
भारती जाधव या अगदी 13 वर्षांच्या असताना त्यांनी त्यांचे दोन्ही हात गमावले. त्यानंतर काही दिवसांनी भारती जाधव यांचा विवाह झाला. मात्र काही कारणास्तव भारती जाधव यांचा त्यांच्या पतीशी घटस्पोट झाला.
घटस्फोट झाल्यानंतर भारती जाधव आपल्या आई सोबत राहू लागल्या. त्यावेळी त्यांना प्रचंड आर्थिक तसेच मानसिक दृष्ट्या त्रास सहन करावा लागला. परंतु हार न मानता भारती जाधव यांनी जिद्दीच्या जोरावर काम करण्याचे ठरवले.
भारती जाधव यांनी बँकेचे कर्ज फेडण्यासाठी स्वतः अपंग असतानाही धाडसी निर्णय घेतला. त्यांनी अवघ्या पंधरा दिवसांत अतिशय उत्तम पद्धतीने गाडी चालवण्याची कला अवगत करुन घेतली.
भारती जाधव शाळेतील मुलांना गाडीतून ने-आण करत होत्या. यावेळी त्यांना अनेक घटनांचा सामना करावा लागला. भारत देशात असणारी पुरुषी सत्ता प्रत्येक वेळी कुठे न कुठे आड येतेच मात्र, या पुरुषी सत्तेवर मात करत भारती जाधव यांनी हे काम यशस्वीपणे पार पाडत आहेत.
भारती जाधव यांच्या या कामावर संपूर्ण मालेगाव शहरातील नागरिकांना अभिमान वाटत आहे. तसेच त्या अनेक अपंग व्यक्तींसाठी प्रेरस्थान बनल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक पालक आपल्या मुलांना भारती जाधव यांच्यावर विश्वासा ठेवू त्यांच्यासोबत शाळेत पाठवत आहेत. त्यामुळे त्यांना हे काम करण्यास अजून उत्साह निर्माण होत आहे.