सर्वच राजकीय नेत्यांनी बोलताना शब्द जपून आणि मोजून वापरले पाहिजेत, असा सल्ला राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांना दिला आहे.
दरम्यान, संजय राऊत यांच्यावर इडीने कारवाई केल्यानंतर राऊत यांनी संसदीय आणि खालच्या भाषेत भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर टीका केली होती.
आज (7 एप्रिल) कर्जत जामखेड या त्यांच्या मतदारसंघातील वारकऱ्यांच्या निवासासाठी उभारण्यात येणाऱ्या भक्तनिवास भूमिपूजनासाठी आमदार रोहित पवार पंढरपुर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.
संजय राऊत यांच्या शिवराळ भाषेविषयी सर्वच स्तरातून नाराजी व्यक्त केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनीही राऊत यांचे कान टोचले आहेत.
कारवाई केल्यानंतर त्यांच्या भावना दुखावल्या असतील ते आपण समजू शकतो. मात्र, सर्वच राजकीय नेत्यांनी बोलताना मोजून आणि मापून बोललं पाहिजे, असं रोहित पवार म्हणाले.