राज्याचे उच्चशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मोठी घोषणा केलीय. महाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षा MHT CET 2022 परीक्षा पढे ढकलली असल्याची घोषणा उदय सामंत यांनी केलीय.
JEE आणि NEET परीक्षा सोबत येत असल्याने MHT CET परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होत होती. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी वेळ मिळावा म्हणून MHT CET परीक्षा पुढे ढकलण्यात आलीय.
काय म्हणाले उदय सामंत?
“जेईई आणि एनईईटी परीक्षांमुळे सीईटी परीक्षा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे. तारखा लवकरच जाहीर केल्या जातील.” असं ट्विट करत उदय सामंत यांनी याबाबत माहिती दिली आहे.
JEE आणि NEET परीक्षांच्या मुळे CET परीक्षा ऑगस्ट पहिल्या आठवड्यात होईल.. तारखा लवकरच जाहीर करू.
— Uday Samant (@samant_uday) April 21, 2022
दरम्यान, JEE, NEET आणि MHT CET या परीक्षांबाबत अनेक अफवा पसरत होत्या, यामुळे विद्यार्थ्यांसाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.