अमरावतीच्या खासदार नवणीत राणा आणि शिवसेना वाद हा काही नवा नाही. नवणीत राणा शिवसेना आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर सतत टिका करत असतात.
सध्या राज्यात हनुमान चालिसेवरुन चांगलाच वाद पेटलाय. मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंचे निवासस्थान मातोश्रीवर येऊन हनुमान चालिसा म्हणू असा इशारा नवणीत राणा यांनी दिला होता.
यावर शिवसेना नेत्या आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी टिका केली होती. मातोश्री म्हणजे तुमचे पिताश्री समजलात का? मातोश्री आमच्या पिताश्रींची आहे. मातोश्रीवर येऊनच दाखवा” असा इशारा किशोरी पेडणेकर यांनी दिला होता.
यावर आता नवणीत राणा यांनी पलटवार केलाय. येत्या २३ तारखेला मुंबईला उध्दव ठाकरेंचे निवासस्थान मातोश्रीवर जाणार असल्याची घोषणा नवणीत राणा यांनी केलीय. तसेच “मी मुंबईची लेक आणि अमरावतीची सुन आहे यामुळे माझ्यामध्ये येण्याचा कोणीही प्रयत्न करु नये” असा इशारा देखील राणा यांनी यावेळी दिलाय.