कोरोना काळात नागरिकांवर उपचार करण्यासाठी आणि त्यांना योग्य सुविधा पुरविण्यासाठी देखील सरकारकडे पैसे उरले नव्हते. मात्र याच काळात सरकारी तिजोरीतून महाविकास आघाडीतील 17 मंत्र्यांनी खासगी रुग्णालयात उपचार घेऊन लाखोंची बिल फाडल्याची मोठी बातमी समोर आली आहे.
या मंत्र्यांनीमध्ये सर्वात जास्त राष्ट्रवादीच्या नेत्यांचा समावेश आहे. कोरोना संकटात नागरिक सरकारी हॉस्पिटलमध्ये बेड मिळवण्यासाठी वणवण फिरत होते. परंतु या सगळ्याचा काहीच फरक न पडून घेता दोन वर्षात खाजगी रुग्णालयात 17 मंत्र्यांनी लाखो रुपये खर्चून उपचार करून घेतले आहेत. विशेष म्हणजे या उपचारासाठी त्यांनी सरकारी तिजोरीतून पैसे घेतले आहेत.
समोर आलेल्या माहितीनुसार, या 17 मंत्र्यांवर सरकारने 1 कोटी 39 लाख खर्च केले आहेत. उपचार घेतलेल्या मंत्र्यांमध्ये राष्ट्रवादीच्या 9, काँग्रेसच्या 6, शिवसेनेच्या 3 मंत्र्यांचा समावेश आहे. महत्वाचे म्हणजे, आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी देखील उपचारासाठी सरकारी तिजोरीतून 34 लाख घेतल्याचे समोर आले आहे.
राजेश टोपे यांच्यासह ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड, पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार, जलसंपदामंत्री जयंत पाटील, परिवहनमंंत्री अनिल परब, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सरकारकडून उपचारांसाठी लाखो रुपये घेतले आहेत.
या सर्व मंत्र्यांनी बॉम्बे हॉस्पिटल , लिलावती हॉस्पिटल, ब्रीच कँण्डी हॉस्पिटल ,जसलोक हॉस्पिटल ,फोर्टिस हॉस्पिटल, अवंती हॉस्पिटल, ग्लोबल हॉस्पिटल , केईएम हॉस्पिटल ,आधार हॉस्पिटल अशा मुंबईतील नावाजलेल्या खागजी रुग्णालयातून उपचार करुन घेतले आहेत. समोर आलेल्या या धक्कादायक माहितीने राजकीय वर्तुळात खळबळ माजवली आहे. अद्याप याबाबत कोणत्याही एका नेत्याने स्पष्टीकरण दिलेले नाही.
महत्वाच्या बातम्या
यंदाचे पहिले सूर्यग्रहण 30 एप्रिल रोजी, पहा ग्रहणाची वेळ काय असेल..
मोठी बातमी! धनंजय मुंडेंना पाच कोटींची खंडणी मागणारी रेणू शर्मा पोलिसांच्या ताब्यात, इंदूरमध्ये केली अटक
“गाढव तुरुंगात जातातच लालपरी मुक्त झाली” शिवसेनेकडून गुणरत्न सदावर्तेंची तुलना गाढवासोबत