वर्षातील सूर्यग्रहण पाहण्यासाठी खगोलप्रेमी आतुरतेने वाट बघत असतात. सूर्यग्रहण पाहणे हे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. या सूर्यग्रहणाच्या वेळेनुसार अनेक तिथी, कार्यक्रम ठरवण्यात येतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला वर्षातील पहिल्या सूर्यग्रहणाबाबत माहिती देणार आहोत.
यावर्षीचे पहिले सूर्यग्रहण एप्रिल महिन्यात होणार आहे. हे सूर्यग्रहण आपण 30 एप्रिल 2022 रोजी पाहू शकतो. असे म्हणले जात आहे की यावर्षीचे सूर्यग्रहण 12 वाजून 15 मिनिटांनी होणार आहे. परंतु या वर्षातील पहिले सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही.
यावर्षीचे सूर्यग्रहण आंशिक ग्रहण असल्याचे मानले जाते आहे. यामुळेच या ग्रहण काळात सुतक कालावधी वैध राहणार नसल्याचे सांगितले जात आहे. शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेचा काही भाग, पॅसिफिक ओशन, अटलांटिक आणि अंटार्टिकच्या काही भागातच हे सूर्यग्रहण दिसणार आहे.
विशेष म्हणजे, यावर्षी एकूण चार ग्रहणे होणार असून त्यापैकी दोन सूर्यग्रहण आणि दोन चंद्रग्रहण असतील. जेव्हा चंद्र हा सूर्य व पृथ्वीच्या मध्ये येतो तेव्हा पृथ्वीवर चंद्राची सावली पडते. या सावलीतून सूर्यग्रहण होते. परंतु हिंदू धर्मात याबाबत अनेक भाकित वर्तविण्यात येतात.
सूर्यग्रहणाबाबत भारतात अनेक खोट्या अफवा पसरल्या आहेत. गर्भवती महिलांनी सूर्यग्रहण पाहू नये किंवा त्याच्या सावलीत येऊ नये अशा अनेक अफवा या सूर्यग्रहणाबाबत गावागावात पसरलेल्या दिसतात. परंतु या सर्व अफवा खोट्या असून सूर्यग्रहण ही एक खगोलीय सामान्य घटना आहे.
महत्वाच्या बातम्या
“गाढव तुरुंगात जातातच लालपरी मुक्त झाली” शिवसेनेकडून गुणरत्न सदावर्तेंची तुलना गाढवासोबत
नवनित राणा २३ एप्रिल दिवशी ५०० कार्यकर्त्यांसह मातोश्रीवर जाणार!
मोठी बातमी: NEET आणि JEE मुळे MHT-CET परीक्षेची तारीख बदलली, वाचा