खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना खार पोलीस ठाण्यात भेटायला जात असताना भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर दुसऱ्यांदा हल्ला झाला आहे. आता या हल्ल्याची गंभीर दखल सीआयएसएफने घेतली आहे. यापुढे हल्ला झाल्यास हल्लेखोरांना दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश सीआयएसएफने दिल्याची माहिती सूत्रांकडून आली आहे.
सीआयएसएफच्या कमांडो विभागाने यासंदर्भात मुंबई पोलीस आयुक्तांशी चर्चा केली आहे. त्याचबरोबर त्यांनी घटनास्थळावरचे फुटेज मागवून घेतले आहे. या फुटेजमधून काही पुरावे सापडू शकतील अशी आशा सीआयएसएफने व्यक्त केली आहे. सध्या या घटनेचा पुढील तपास मुंबई पोलिसांच्या साहाय्याने सीआयएसएफ करत आहे.
कायद्यानुसार, हल्लेखोरांना थांबवण्यासाठी सीआयएसएफ हवेत गोळीबार करू शकते. या आदेशाची अंमलबजावणी करण्यापूर्वी सीआयएसएफच्या जवानांवर असा हल्ला रोखण्याची प्राथमिक जबाबदारी असते. खूप दुर्मिळ घटनांमध्ये थेट हल्लेखोरांवर गोळीबार करण्याची परवानगी सीआयएसएफला देण्यात आली आहे.
दरम्यान किरीट सोमय्यांवर दुसऱ्यांदा हल्ला झाल्यामुळे या प्रकरणात कठोर कारवाई करण्याचे आदेश निघाले आहे. जर इथून पुढे त्यांच्यावर हल्ला झाला तर या हल्लेखोरांवर गोळी झाडण्याचे आदेश सीआयएसएफला देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र अद्याप याबाबत कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही.
सर्वात पहिल्यांदा किरीट सोमय्यांवर फेब्रुवारी महिन्यात पुण्यातील जम्बो कोविड सेंटरमध्ये हल्ला झाला होता. हा हल्ला शिवसेनेने घडवून आणल्याची माहिती सोमय्यांनी दिली होती. त्यानंतर राणा दाम्पत्याला भेटण्यासाठी जाताना सोमय्यांवर दुसरा हल्ला झाला आहे. त्यामुळे या हल्ल्याची गंभीर दखल सीआयएसएफने घेतली आहे.
महत्वाच्या बातम्या
“मला पाणी दिलं नाही” म्हणणाऱ्या राणांची फजिती, पोलिसांनी दाखवला चहा पितानाचा व्हिडीओ
मोठी बातमी: औरंगाबाद शहरात ९ मे पर्यंत जमाव बंदी, राज ठाकरेंची सभा रद्द?
MPSC आयोगाची मोठी चूक, परीक्षा पास झालेल्या अनाथ विद्यार्थ्यीनीवर अन्याय, वाचा