राज्य सरकारने विद्यापीठांच्या परीक्षा संदर्भात मोठी घोषणा केली आहे. यावर्षीचा विद्यापीठांच्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीने होणार असून त्या १ ते १५ जुलैदरम्यान घेतल्या जाणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. दोन वर्षात ऑनलाइन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे सरकारने आता ऑफलाईन परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी काही संस्थांनी आणि विद्यालयांनी ऑनलाईन परीक्षा घेण्यात यावी अशी मागणी केली होती. या मागणीचा विचार करण्यासाठी शिक्षण मंडळाने एक बैठक बोलावली होती. या बैठकीतच ऑफलाइन परीक्षा होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
बैठकीनंतर उदय सामंत यांनी म्हटले की, “कुलगुरूंच्या बैठकीमध्ये ऑफलाईन परीक्षा घेण्यासंदर्भात बहुसंख्य विद्यापीठ कुलगुरु ठाम आहेत. परीक्षा घेताना विद्यार्थ्यांना प्रश्न संच विद्यापीठ देणार आहे. दोन पेपरमध्ये दोन दिवसाचे अंतर असणार आहे, परीक्षा मे मध्ये न घेता १ जून ते १५ जुलै पर्यंत होतील असे कुलगुरूंनी निश्चित केले आहे.”
दरम्यान कोरोना काळात विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान झाले आहे. हे नुकसान भरून काढण्यासाठी सर्वच विद्यालये प्रयत्न करताना दिसत आहेत. राज्यात परीक्षांमध्ये उडालेल्या गोंधळामुळे अगोदरच वाद पेटलेला आहे. अशातच ऑफलाइन परीक्षांच्या निर्णयावर सरकार ठाम असल्याचे समोर आले आहे.
महत्वाच्या बातम्या
धक्कादायक: मागील ३ वर्षात राज्यात १५ हजार बालविवाह, राज्यसरकारची माहिती
किरीट सोमय्यांच्या हल्लेप्रकरणात CISF ची गंभीर दखल, हल्लेखोरांना गोळ्या घालण्याचे आदेश?
“मला पाणी दिलं नाही” म्हणणाऱ्या राणांची फजिती, पोलिसांनी दाखवला चहा पितानाचा व्हिडीओ