देशातील वाढती कोरोना रुग्णसंख्या बघता आज पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्या उपस्थितीत सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची आढावा बैठक पार पडली आहे. या बैठकीला आरोग्यमंत्री राजेश टोपे देखील उपस्थित होते. यावेळी त्यांनी राज्याची परिस्थिती नरेंद्र मोदींसमोर मांडली.
त्यांनी सांगितले की, “आम्ही रोज 25 हजारपर्यंत टेस्टिंग करत आहोत. हे टेस्टिंग वाढवत आहोत. आपलं राज्य सेफ झोनमध्ये आहे. आज 929 ॲक्टिव्ह केसेस आहेत. पर मिलियनमध्ये आपण खूप कमी आहोत. दर लाखामागे राज्यात 7 केसेस आहेत. टेस्टिंग वाढवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. यासोबतच ट्रॅकिंग सुद्धा आम्ही करणार आहोत.”
तसेच, “लसीकरण करण्यात आपण खूप पुढे आहोत. 6 ते 12 वयोगटासाठी नव्याने लसीकरण करण्याची परवानगी देण्यात आली आहे. नियमावली आली की लगेचच राज्यात लसीकरण सुरु होईल. 12 ते 15, 15 ते 17 या वयोगटातील मुलांचे लसीकरण आम्ही वाढवत आहोत. सध्या नव्या कोणत्याही व्हायरसची माहिती नाही. प्रिकॉशन डोसमधे सुद्धा आम्ही गती वाढवत आहोत.” अशी माहिती त्यांनी दिली आहे.
त्याचबरोबर, “आज मुख्यमंत्री सांयकाळी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. त्यामुळे त्या मिटींगच्या अनुषंगाने कदाचित गर्दीच्या ठिकाणी पुन्हा मास्क अनिवार्य होऊ शकतात. असा या बैठकीनंतर निर्णय होऊ शकतो. गर्दीच्या ठिकाणी मास्क घालायला हवेत. त्या दृष्टीने एक साधारण चर्चा झाली आहे.” असे राजेश टोपे यांनी सांगितले आहे.
दरम्यान, “काळजी घ्या आणि कार्यवाही करा या संदर्भात ज्या काही बाबी सांगितलेल्या आहेत, त्यामध्ये टेस्टिंग आम्ही नक्कीच वाढवू, ट्रॅकींग करू आणि गरजेप्रमाणे निश्चित उपचार करू. त्याचबरोबर जर काही पॉझिटिव्ह आढळले तर ज्याबाबात जे जिनोमिंक सिक्वेन्सिंग आहे, ते देखील करायला सांगितलं.” अशी सर्व माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
रेणू शर्मा निर्दोष असल्याचा करुणा मुंडेंचा दावा, म्हणाल्या.., “नेहमी सत्याचाच विजय होतो”
३ मे रोजी राज्यात अशांतता पसरविण्याचा कट?, प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केली भीती
“हिंदुस्थानला तीन बाधा झाल्या आहेत, त्यातली एक गांधीबाधा आहे” संभाजी भिंडेचे खोचक वक्तव्य