एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी नुकतीच एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२१ मध्ये प्रवेश घेतलेल्या उमेदवारांचे प्रवेश प्रमाणपत्रे जारी करण्यात आले आहे. http://mpsconline.gov.in या संकेतस्थळावर जाऊन उमेदवार आपले प्रवेश प्रमाणपत्र डाऊनलोड करु शकतात.
प्रवेश प्रमाणपत्र विद्यार्थ्यांकडे नसल्यास त्याला परीक्षेला बसू दिले जाणार नाही. त्यामुळे या प्रवेश प्रमाणपत्राची प्रत विद्यार्थ्यांजवळ असणे गरजेचे असणार आहे. येत्या 7, 8 आणि 9 मे रोजी महाराष्ट्र राज्य सेवा मुख्य परीक्षा 2021 होणार आहे. कोरोनाचे सर्व नियम पाळणे विद्यार्थ्याला बंधनकारक असणार आहे.
आयोगाकडून जारी करण्यात आलेल्या सूचनांचे आणि नियमांचे पालन करणे विद्यार्थ्याला आवश्यक आहे. कोरोना विषाणूमुळे राज्यातील सर्वच परिक्षा उशिरा पार पडल्या आहेत. मात्र सध्या राज्यातील स्थिती सावरली असल्यामुळे या परिक्षा लवकरच होणार आहेत.
यासाठीच आयोगाने विद्यार्थ्यांचे प्रवेश प्रमाणपत्रही जारी केले आहे. हे प्रवेशपत्र जवळ असणे विद्यार्थ्यांना बंधनकारक असणार आहे.