राज्यातील मशिदीवरचे भोंगे ३ मे पर्यंत उतरवा असा इशारा राज ठाकरेंनी सरकारला दिला आहे. यानंतर राज्यातील वातावरण चांगलंच तापलंय. यासाठी महाराष्ट्र दिना दिवशी मनसे प्रमुख राज ठाकरे औरंगाबादमध्ये सभा घेणार आहेत.
या सभेसाठी मनसेकडून जय्यत तयारी सुरु आहे. १ मे दिवशी होणाऱ्या सभेसाठी राज ठाकरे आज औरंगाबादला रवाना झालेत. यावेळी जाताना राज ठाकरेंना पुण्यातील पुरोहितांनी सभेसाठी आशिर्वाद दिला आहे. यावेळी पुण्यातील १०० ते १५० पुरोहित ब्राह्मण उपस्थित होते.
यानंतर राज ठाकरे आपल्या सभेसाठी औरंबादसाठी रवाना झाले आहेत. राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरे हे या सभेचा आढावा आणि तयारी पाहण्यासाठी औरंगाबादमध्ये दाखल झाले आहेत.
यासाठी राज ठाकरेंना विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्यासह एकूण ८ संघटनांनी पाठिंबा दिलाय. याच पार्श्वभूमीव औरंबाबादच्या सभेनंतर ३ तारखेला राज ठाकरे पुण्यात महाआरती करणार आहेत.