बॉलीवूडची सर्वात सुप्रसिद्ध गायिका नेहा कक्कर सोशल मीडियावर सर्वात जास्त सक्रिय असते. ती पती रोहनप्रीत सिंगसोबत नवनवीन व्हिडिओ फोटो शेअर करत राहते. सध्या रोहनप्रीत आणि नेहाची जोडी सर्वात क्युट कपल मधली एक आहे. परंतु या क्युट कपलसोबत एक विचित्र घटना घडली आहे.
रोहनप्रीत सिंगचे काही सामान एका हॉटेलमधून चोरीला गेले आहे. शुक्रवारी रात्री हिमाचल प्रदेशातील मंडी येथे एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये रोहनप्रीत थांबला होता. यावेळी त्यांच्यासोबत नेहादेखील होती. फक्त एका रात्रीसाठी त्यांनी हॉटेलमधली एक रूम बुक केली होती.
परंतु याच रात्री त्यांच्या रूममधून अॅपल वॉच, आयफोन आणि हिऱ्याची अंगठी चोरीला गेली आहे. हे सर्व सामान रोहनप्रीतचे आहे. या चोरीची तक्रार रोहनप्रीतने जवळील पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. तक्रारीनंतर पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
त्यांनी हॉटेल्सचे सीसीटीव्ही फुटेज चेक करत कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यास सुरुवात केली आहे. अद्याप त्यांच्या हाती कोणतीही माहिती लागलेली नाही. चोरीला गेलेल्या सर्व सामानाची किंमत लाखोंच्या घरात आहे. दरम्यान नेहा आणि रोहनप्रीतच्या लग्नाला बराच काळ उलटून गेला आहे.
नेहासोबत रोहनप्रीतने देखील बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये आपले नाव कमावले आहे. रोहनप्रीत एक गायक असून त्याची अनेक गाणी लोकप्रिय आहेत. हे दोघे सतत सोशल मीडियावर आपले फोटो शेअर करत असतात. या दोघांचाही फॅन फॉलोविंग वर्ग मोठा आहे.