कार्डिलिया ड्रग्सप्रकरणाबाबत आर्यन खानला दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. एनसीबीने आज न्यायालयात ६ हजार दोषारोपपत्र दाखल केले होते. परंतु, आर्यन खानसह पाच जणांविरोधात ठोस पुरावे नसल्याने त्याची निर्दोष मुक्तता केली आहे.
काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला कार्डिलिया ड्रग्सप्रकरणी अटक केली होती. या प्रकरणी त्याला जामीनही मंजूर झाला होता. न्यायालयाने एनसीबीला या प्रकरणी दोन महिन्यांचा कालावधी वाढवून दिला होता. हा कालावधी संपताच एनसीबीने आज ६ हजार दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले.
परंतु, एनसीबीला आर्यन खान, आनंद गोपाल, मानव सिंघल, समीर सैघन, अविन साहू आणि भास्कर अरोरा यांच्याविरोधात कोणतेही प्रबळ पुरावे सापडले नाहीत. त्यामुळे न्यायालायाने त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे. परंतु याप्रकरणी इतर १४ जणांविरोधात एनसीबीने आरोपपत्र दाखल केले असल्याची माहिती एनसीबीचे वरिष्ठ अधिकारी संजय सिंग यांनी दिली आहे.
देशभर गाजलेल्या कार्डिलिया ड्रग्सप्रकरणी आर्यन खान याला माजी एनसीबी प्रमुख समीर वानखेडे यांनी अटक केली होती. आर्यन खानची सुटका झाल्यानंतर त्यांनी याप्रकरणी बोलणे टाळले आहे. ” माफ करा, मी एनसीबीमध्ये नाही. त्यामुळे, याप्रकरणी मी काही बोलू शकत नाही. यासंदर्भात संबंधित अधिकार्यांशी बोला “, असे म्हणत त्यांनी यावर प्रतिक्रिया देणे टाळले आहे.