रवि जाधव दिग्दर्शित टाईमपास आणि टाईमपास २ दोन्ही चित्रपट प्रेक्षकांना चांगलेच आवडले होते. दगडू शांताराम परब हे नाव महाराष्ट्रातील प्रत्येक प्रियकराला माहिती आहे.
ADVERTISEMENT
टाईमपास आणि टाईमपास २ हे दोन्ही चित्रपट हिट होते. मागील अनेक दिवसांपासून टाईमपास ३ ची सर्व मराठी प्रेक्षकांना उत्सुकता लागली होती.
या चित्रपटात आपल्याला प्रसिध्द मराठी अभिनेत्री हृता दुर्गुळे नव्या अंदाजात पाहायला मिळणार आहे. टाईमपास ३ मध्ये हृताने पालवी ही एका डॅशिंग मुलीची भूमिका साकारली आहे.
ADVERTISEMENT
दरम्यान, हा चित्रपट येत्या २९ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. मात्र यात आपल्या प्राजू दिसणार का ? चित्रपटात दगडू नेमकं काय करणार ? आणि हृता दुर्गुळे चित्रपटात नेमका काय धुमाकूळ घालणार असा प्रश्न सर्वानाच पडला आहे.