शैक्षणिक वर्ष २०२२-२३ या वर्षाच्या पदविका प्रवेश प्रक्रियेत महत्वाचे बदल करण्यात आले आहेत. याबाबत राज्याचे उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी विद्यार्थ्यांसाठी मोठी घोषणा केलीय.
कोणताही ट्रेड घेऊन ITI उत्तीर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षाला प्रवेश मिळणार असल्याची घोषणा उदय सामंत यांनी केली आहे. या निर्णयामुळे १० हजार विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे.
मुंबईतील विद्यालंकार तंत्रविज्ञान या विद्यालयात एका कार्यक्रमासाठी उदय सामंत उपस्थित होते. उदय सामंत यांच्या हस्ते तंत्रशिक्षण पदविका प्रवेश प्रक्रियेच्या ऑनलाइन पोर्टलचे उद्घाटन आणि तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अद्यावत संकेतस्थळाचे पुन:लोकार्पण करण्यात आले.
या कार्यक्रमानंतर सामंत यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली आहे. तसेच १० वी नंतर घेण्यात येणाऱ्या त्रशिक्षण पदविका (पॉलिटेक्निक) अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आल्याचं देखील उदय सामंत यांनी जाहीर केले.