भारताची स्टार खेळाडू आणि कर्णधार मिताली राज हिने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली आहे. मितालीने तब्बत दोन दशकं भारतीय महिला संघाचे प्रतिनिधित्व केलंय.
संपूर्ण कारकिर्दीत अनेक विक्रम देखील मितालीने आपल्या नावावर केलेत. महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम देखील मितालीच्याच नावावर आहे.
मात्र मितालीच्या निवृत्तीनंतर भारतीय संघाचं नेतृत्व कोण करणार असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. याबाबत BCCI ने घोषणा केलीय. भारतीय महिला संघाची अनुभवी खेळाडू हरमन प्रीत आता महिला संघाची धुरा सांभाळणार आहे.
दरम्यान, अखिल भारतीय महिला निवड समितीच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आलाय. या बैठकीत आगामी श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय महिला संघाची घोषणा करण्यात आलीय.