देशातील अनेक भागांमध्ये दिवसेंदिवस कोरोनाची रुग्ण संख्या वाढताना दिसत आहे. त्यामुळे नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने प्रवाशांना शक्तीने मास्क वापरण्याचे आवाहन केले आहे. इतकेच नव्हे तर, “विमानतळांवर तसेच विमानात प्रवासादरम्यान मास्क न घातल्यास त्या प्रवाशाला बाहेर काढण्यात येईल” असे देखील महासंचालकांनी सांगितले आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, 3 जून रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने विमानतळावर आणि विमानात मास्क घालने सक्तीचे करण्यात यावे असे विमान महासंचालकांना आदेश दिले आहेत. न्यायालयाने दिलेल्या या आदेशानंतरच महासंचालकांनी मास्क घालने सक्तीचे केले आहे.
न्यायालयाने दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, जर कोणत्या प्रवाशांने मास्क घातले नसेल तर त्या प्रवाशांची नावे ‘नो-फ्लाय’ यादीत टाकण्यात यावी. तसेच त्यांच्याकडून दंड आकारण्यात यावा. त्यामुळे विमान महासंचालकांनी मास्क न घालणार्यांविरोधात कठोर भूमिका घेतली आहे.
दरम्यान देशात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या बघता सर्व पातळीवर वेगवेगळ्या उपाययोजना राबविण्यात येत आहेत. दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. त्यामुळे प्रशासनासोबत नागरिकांच्या चिंतेत देखील भर पडली आहे.