बॉलीवूडचा प्रसिध्द अभिनेता अक्षय कुमारने आपल्या कारकर्दित वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर अक्षय कुमार प्रमुख भूमिकेत असणारा पृथ्वीराज चित्रपट सध्या प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. मात्र हा चित्रपट फ्लॉप ठरल्याचं दिसून येतंय. देशात अनेक ठिकाणी प्रेक्षक नसल्यामुळे या चित्रपटाचे शौ रद्द करण्यात आलेत.
या चित्रपटात अक्षय कुमारसोबत तगडं स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. २०१७ साली मिस वर्ल्ड झालेली मानुषी चिल्लर या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. यात तिने राजकुमारी संयुक्ताची भूमिका साकारलीय.
यासोबतच या चित्रपटात आणखी दोन मोठे चेहरे पाहायला मिळणार आहेत. अभिनेता संजय दत्त याने चित्रपटात ‘काका कान्हा’ ही भूमिका साकरलीय. तर अभिनेता सोनू सुद याने ‘चांदरबाय’ ही भूमिका साकारली आहे. मात्र या चित्रपटात अक्षय कुमार याने घेतलेले मानधन चर्चेचा विषय ठरला आहे. पाहुयात कोणत्या कलाकाराने किती मानधन घेतले?
मानधन
१. मानुषी छिल्लर – १ कोटी
२. मानव वीज – १० लाख
३. संजय दत्त – १० कोटी
४. सोनू सुद – ३ कोटी
५. अक्षय कुमार – ६० कोटी
दरम्यान, हा चित्रपट जरी मोठा फ्लॉप ठरला असला तरी अक्षय मात्र मालामाल झाल्याचे पाहायला मिळत आहे. याच कारणावरून अक्षय सध्या सोशल मीडियावर ट्रोल होताना दिसत आहे.