इंटरनेटमुळे लहान मुलांपासून तरुण मुले गेमच व्यसन लागले आहे. ऑनलाईन गेमिंगमुळे मुलांच्या शारीरिक तसेच मानसिकतेवर परिणाम होतो. या मुलांच्या व्यसनामुळे त्यांचे कुटुंबीयही उद्ध्वस्त झालेली आपण पाहिली आहेत. मानसिक आरोग्य संस्थेचे वैद्यकीय अधीक्षक दिनेशसिंह राठोड यांनी यामागची कारणे सांगितली आहेत.
कुटुंबातील मोठ्या व्यक्तींना गेमचे व्यसन असते. त्यामुळे सहाजिकच लहान मुलांनाही त्याचे व्यसन लागते. पुर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती. त्यामुळे सर्वजण एकमेकांशी बोलत होते. परंतु आता छोट्या कुटुंबात मन मोकळेपणाने बोलणे होत नाही. त्यामुळे या कुटुंबातील मुलांचा एकटेपणा वाढू लागतो. त्यामुळे त्यांना गेमची सवय लागते.
गेम खेळत असताना या मुलांना बक्षीस मिळणार एक रुपया किंवा इतर गोष्टी त्यांना आकर्षित करतात. यामुळे त्यांना या गेम्सच व्यसन कधी लागते हे समजत नाही. बऱ्यापैकी तरूण मुलांकडे आज मोबाईल उपलब्ध आहेत. त्यामुळे त्यांना सहज गेमचे व्यसन लागते.
गेमच्या आहारी गेल्याने ही मुले गेम्सच्या विश्वाला आपले विश्व समजतात.त्यामुळे त्यांना नैराश्य येते. १५ ते १९ वर्षांतील मुलांचा स्वभाव हा विद्रोही असतो. त्यामुळे त्यांना जर कोणी समजावण्याचा प्रयत्न केला तर ती व्यक्ती त्यांना त्यांचा शत्रू आपला वाटतो.
ऑनलाईन गेम्स खेळण्यामुळे मुलांमध्ये चिडचिडेपणा, नैराश्य आणि स्वभावात बदल झाला आहे. जास्त गेम्स खेळल्यामुळे त्यांच्या वागण्यात बदल होतो हे ८७ टक्के गेम्स खेळणाऱ्यामुळे मान्य केले आहे.