दक्षिण आफ्रिका विरुध्दच्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाला लाजीरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. या सामन्यात मोठी धावसंख्या उभारून देखील भारताचा ७ विकेट्सने पराभव झाला.
सध्या दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौऱ्यावर आला आहे. या दौऱ्यात ५ टी-२० सामने खेळवण्यात येणार आहेत. या मालिकेसाठी प्रमुख खेळाडूंना आराम देण्यात आल्यामुळे युवा खेळाडूंचा संघ मैदानात उतरला आहे.
९ जूनला पार पडलेल्या पहिल्या सामन्यात भारताने पहिल्या डावात २११ धावसंख्या उभारली होती. मात्र साऊथ आफ्रिकेच्या फलंदाजांनी तुफान फटकेबाजी करत ७ विकेट्सने विजय मिळवला.
याच पार्श्वभूमीवर आज दुसरा टी-२० सामना पार पडणार आहे. यासाठी भारतीय संघ जोरदार तयारी करताना दिसत आहे. भारतीय संघाचा कर्णधार रिषभ पंत आणि हार्दिक पांड्या नेट्समध्ये कसून सराव करताना दिसत आहे.
🔊 Sound 🔛
Some cracking hits from the Captain and Vice-captain get the crowd going. 👌 👌#TeamIndia | #INDvSA | @RishabhPant17 | @hardikpandya7 | @Paytm pic.twitter.com/JoRKKzwvpJ
— BCCI (@BCCI) June 11, 2022
यामुळे आजच्या सामन्यात भारतीय संघ कशी कामगिरी करणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागलंय.