बॉलीवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोणला प्रकृती बिघडल्याच्या कारणाने त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हैदराबादमध्ये आगामी चित्रपटाची शूटिंग करताना दीपिकाची तब्येत अचानक बिघडली होती. त्यामुळे लगेचच तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली असल्याची माहिती समोर आली आहे.
लवकरच दीपिका पदुकोण सुपरस्टार प्रभाससोबत आगामी चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाची शूटिंग हैदराबाद येथील रामोजी फिल्म सिटीमध्ये सुरू आहे. यापूर्वीदेखील तब्येत बिघडल्यामुळे दीपिका पदुकोण हैदराबाद येथील रुग्णालयात उपचारासाठी गेली होती. मात्र तेव्हा काही काळजीचे कारण नसल्याचे समोर आले होते.
दरम्यान दरम्यान दीपिका पदुकोणचा आगामी चित्रपट पठाण लवकरच सर्वांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात दीपिका अभिनेता शाहरुख खानसोबत झळकणार आहे. त्यानंतर दीपिकाचा ‘फायटर’ चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे सध्या दीपिका आपल्या कामात पूर्णपणे व्यस्त आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वीच 75 वा कान्स फिल्म फेस्टिव्हल पार पडला. यावेळी दीपिकाचे नाव ज्युरी मेंबर्सच्या यादीत होते. त्यामुळे ही बाब तीच्यासाठी अभिमानास्पद होते. दीपिका नेहमीच आपल्या अभिनयामुळे बॉलिवूडमधील सर्वात सुप्रसिद्ध कलाकार ठरली आहे.