बाजारात नेहमीच फणस सहज उपलब्ध होते. मात्र, बऱ्याच लोकांना फणस आवडत नाही. परंतू, तुम्हाला फणस खाल्लाने काय फायदे होतात हे माहिती आहे का? होय फणस हे आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयुक्त आहे.
फणस हे आपण कच्चं किंवा पिकलेलं देखील खाऊ शकतो. फणस हे असं आहे की, ज्याचा भाजी म्हणून देखील उपयोग होतो. पण पिकल्यानंतर याचा फळ म्हणून देखील वापर होतो. यामधये अनेक व्हिटामिन, खनिजं, फायटोन्यूट्रिएंट्स, फायबर, प्रोटीन आणि इलेक्ट्रोलाइट्स देखील असतात.
1. फणसामध्ये अनेक पौष्टिक घटक आढळतात, जसे की व्हिटॅमिन ए, सी, थायामिन, पोटॅशियम, कॅल्शियम, रिबोफ्लेविन, लोह, नियासिन आणि जस्त इ. यामध्ये भरपूर फायबर आढळते.
2. फणसामध्ये कॅलरीज अजिबात नसतात. पिकलेल्या फणसाचा लगदा नीट कुस्करून पाण्यात उकळून घ्यावा आणि हे मिश्रण थंड झाल्यावर ग्लासभर प्यायल्याने इनर्जी येते, हृदयरोग्यांसाठी ते उपयुक्त मानले जाते.
3. फणसामध्ये पोटॅशियम आढळते, जे हृदयाची प्रत्येक समस्या दूर करते आणि ते रक्तदाब कमी करते.
4. फणसामध्ये भरपूर लोह आढळते. त्यामुळे अशक्तपणा दूर होतो. शरीरातील रक्ताभिसरण वाढवते .
5. दम्याच्या रुग्णांसाठी फणस मूळ लाभदायक मानले जाते, याच्या मुळ्या पाण्यात उकळवून उरलेले पाणी गाळून प्यायल्याने दमा नियंत्रित होतो.
6. फणस थायरॉईडसाठी देखील चांगले आहे, त्यात असलेली सूक्ष्म खनिजे आणि तांबे थायरॉईडवर प्रभावी आहे.
7. फणसात व्हिटामिन ए चं एक पॉवरहाऊस आहे. हे पोषक तत्व बॅक्टेरिया आणि व्हायरल संक्रमणशी लढण्यात मदत करतं. यामुळे ते डोळ्यांसाठी पोषक मानलं जातं. एवढंच नव्हे तर हे रेटिनाची झीज देखील रोखण्याचं काम करतं. त्यामुळे मोतीबिंदूसारख्या रोगांची जोखीम देखील खूपच कमी होते. त्यामुळेच फणस हे खूपच आरोग्यदायी समजलं जातं.
8. फणस अल्सर आणि पचनाच्या समस्या दूर करते.