दे धक्का हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वात गाजलेल्या चित्रपटांपैकी एक आहे. आजही या चित्रपटाची क्रेझ मराठी रसिकांवर कायम आहे.
मकरंद अनासपुरे, सिध्दार्थ जाधव, शिवाजी साटम, मेधा मांजरेकर आणि सक्षम कुलकर्णी या प्रमुख कलाकारांनी या चित्रपटात अभिनय केला होता. आजही दे धक्का चित्रपट मराठी प्रेक्षक तितक्याच आवडीने पाहतात.
मागील अनेक दिवसांपासून दे धक्का चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र आता प्रेक्षकांची प्रतिक्षा संपली आहे.
दे धक्का-२ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे#DeDhakka2 pic.twitter.com/QCzCANldGz
— TheBhongaa.com (@Bhongaa_) June 16, 2022
दे धक्का-२ चा टिझर रिलीज झाला असून प्रेक्षकांनी याला चांगली पसंती दाखवली आहे. अभिनेते सिध्दार्थ जाधव याने इन्स्टाग्रामवर हा टिझर शेअर केलाय. दे धक्का २ येत्या ५ ऑगस्टला सिनेमागृहात येणार आहे.