सुप्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट आणि अभिनेता रणबीर कपूर यांच्या ब्रह्मास्त्र चित्रपटाचा ट्रेलर बुधवारी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. मात्र या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होतात यावर अनेकांनी टीका केली आहे. ब्रह्मास्त्र चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. सध्या चित्रपटाविरोधात #BoycottBrahmastra असा ट्रेंड चालवला जात आहे.
कारण की, या चित्रपटातील एका सीनमुळे प्रेक्षकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. चित्रपटाच्या एका सीन मध्ये रणवीर कपूर बूट घालून मंदिरात पाया पडायला गेलेला दाखवला आहे. त्याने केलेल्या या कृत्यावर अनेकांनी टीका केली आहे. तसेच काहींनी हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप रणवीरवर लावला आहे.
https://www.instagram.com/tv/Cez7hwgA3kf/?igshid=YmMyMTA2M2Y=
त्यामुळे सध्या नेटकऱ्यांनी रणवीर कपूरने माफी मागावी अशी मागणी केली आहे. मुख्य म्हणजे, सुरुवातीपासूनच या चित्रपटावर वेगवेगळी वक्तव्य आणि टीका होताना दिसत आहे. “हा चित्रपट हॉलिवूडमधील अवेंजर्स चित्रपटाची कॉपी आहे” असे नेटकऱ्यांनी म्हणले आहे.
दरम्यान ब्रह्मास्त्र चित्रपटातून आलिया भट आणि रणवीर कपूर यांची जोडी पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती देखील दाखवली आहे. चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च होताच एका तासातच तब्बल 1.1 मिलियन लोकांनी हा ट्रेलर पाहिला आहे. त्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांना आवडेल असे अनेकांकडून सांगण्यात येत आहे.