भारतात लोकशाही पद्धतीने राज्यकारभार चालवला जातो. यामध्ये केंद्रात राज्यसभा व लोकसभा ही सभागृहे असतात. तसेच राज्यात विधान सभा ( Vidhan sabha) व विधान परिषद ( Vidhan parishad) ही सभागृहे पहायला मिळतात. महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या 10 जागांसाठी सोमवारी (20 जून) मतदान होणार आहे. सत्ताधारी पक्ष महाविकास आघाडी व भारतीय जनता पार्टी यांच्यातील चुरस या निवडणुकीत पहायला मिळणार आहे. म्हणून विधान परिषदेबद्दल अधिक जाणून घेऊयात.
विधानपरिषदेची रचना कशी असते ? राज्याच्या कारभारात विधान परिषद हे वरिष्ठ सभागृह मानले जाते. हे एक स्थायी सभागृह आहे. दर दोन वर्षांनी या सभागृहातील एक तृतीय सदस्य निवृत्त होतात. विधान परिषदेची एकूण सदस्य संख्या किमान 40 असावी लागते. सध्या विधान परिषदेतील सदस्य संख्या 78 इतकी आहे. यातील 30 सदस्य विधानसभा सदस्यांमार्फत निवडले जातात. 22 सदस्य विविध स्थानिक प्राधिकारी संस्थांमार्फत निवडले जातात.
पदवीधर मतदारसंघांमधून व शिक्षक मतदारसंघांमधून प्रत्येकी 7 सदस्य निर्वाचित होत असतात. याव्यतिरिक्त वाडःमय, शास्त्र, कला, सहकारी चळवळ आणि समाजसेवा या क्षेत्रातील 12 सदस्य हे राज्यपालांद्वारे नामनियुक्त केले जातात. देशातील फक्त महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगण, उत्तर प्रदेश आणि बिहार या राज्यांमध्येच विधान परिषद आहे.अशी होते विधान परिषद निवडणूक विधानपरिषदेत थेट निवडणूक प्रक्रिया नसते. राष्ट्रपती निवडणूक, सिनेट यांसारख्या पसंती क्रमांमधून ही निवडणूक होते. विधान परिषदेत आमदार गुप्त मतदान करतात. यामध्ये निवडणुकीसाठी जितके मतदार उभे असतील तेवढ्या उमेदवारांना पसंतीक्रम देता येतो. मतदार संख्या आणि उमेदवार यांच्यानुसार निवडणूक आयोग एक कोटा तयार करते. निर्धारित कोटा पूर्ण करणारा कोणत्याही पसंतीचा उमेदवार विजयी होऊ शकतो. यात कोणाचेही मतदान वाया जाणार नाही याची काळजी घेतली जाते.
अशी होते विधान परिषद निवडणूक विधानपरिषदेत थेट निवडणूक प्रक्रिया नसते. राष्ट्रपती निवडणूक, सिनेट यांसारख्या पसंती क्रमांमधून ही निवडणूक होते. विधान परिषदेत आमदार गुप्त मतदान करतात. यामध्ये निवडणुकीसाठी जितके मतदार उभे असतील तेवढ्या उमेदवारांना पसंतीक्रम देता येतो. मतदार संख्या आणि उमेदवार यांच्यानुसार निवडणूक आयोग एक कोटा तयार करते. निर्धारित कोटा पूर्ण करणारा कोणत्याही पसंतीचा उमेदवार विजयी होऊ शकतो. यात कोणाचेही मतदान वाया जाणार नाही याची काळजी घेतली जाते.
विधानपरिषद निवडणूक 2022 विधानपरिषदेची सध्याची होत असलेली निवडणूक ( Vidhan parishad election 2022) ही विधानसभा सदस्यांमार्फत निवडल्या जाणाऱ्या 30 जागांपैकी 10 जागांवर होत आहे. याशिवाय राज्यपालांमार्फत नामनिर्देशित केल्या जाणाऱ्या 12 जागांचा प्रस्ताव राज्य सरकारने पाठवून दिला असून त्यावर अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. राज्यसभा निवडणुकीतील भाजपाची खेळी अनपेक्षित होती त्यामुळे ही विधानपरिषदेची निवडणूक सुद्धा रंगत आणणारी ठरणार आहे.